मंगळसूत्र १ किलो वजनाचं आणि गुडघ्यापर्यंत लांब; लग्नाच्या वाढदिवशी पतीने दिली पत्नीला भेट; व्हिडिओ व्हायरल

लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला तब्बल एक किलो वजनाचं आणि गु़डघ्यापर्यंत लांब मंगळसूत्र (a knee length mangalsutra) देणाऱ्या पतीची सध्या सोशल मीडियावर (social media) चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत लग्नाचं सेलिब्रेशन (the wedding celebration) सुरु असून यावेळी महिलेने हे मंगळसूत्र घातल्याचं दिसत आहे. दरम्यान शेजारी उभा असलेला पती गाणं गात सेलिब्रेशन करत असतानाचा हा व्हिडीओ तुमच्याही पाहण्यात आला असेल.

    भिवंडी (Bhivandi).  लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला तब्बल एक किलो वजनाचं आणि गु़डघ्यापर्यंत लांब मंगळसूत्र (a knee length mangalsutra) देणाऱ्या पतीची सध्या सोशल मीडियावर (social media) चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत लग्नाचं सेलिब्रेशन (the wedding celebration) सुरु असून यावेळी महिलेने हे मंगळसूत्र घातल्याचं दिसत आहे. दरम्यान शेजारी उभा असलेला पती गाणं गात सेलिब्रेशन करत असतानाचा हा व्हिडीओ तुमच्याही पाहण्यात आला असेल. सोन्याचा दर तोळ्यामागे ५० हजारांपर्यंत पोहोचलेला असताना एक किलो सोन्याचा हार दिल्यामुळे नेटकरी आश्चर्य व्यक्त करत होते. भिवंडीमधील (Bhiwandi) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसही चक्रावले होते. (the police also went on a rampage)

    व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस संबंधित दांपत्याच्या घऱी पोहोचले होते. हा व्हिडीओ पोस्ट करुन कुटुंबाने एकाप्रकारे आपल्या जीवाला धोका निर्माण करत चोरांना निमंत्रणच दिलं होतं. यामुळे पोलिसांनी यावेळी पती बाळा यांच्याकडे चौकशी केली. मात्र चौकशीदरम्यान पोलिसांना हे मंगळसूत्र खोटं असून सोन्याच्या दुकानातून ३८ हजारांना विकत घेतलं असल्याचं बाळा यांनी सांगितलं.

    चौकशी केल्यानंतर बाळा यांना सोडण्यात आलं. “व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमच्याही तो निदर्शनात आला होता. इतकं सोनं असणं आणि त्याचं प्रदर्शन करणं गुन्हेगारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. चौकशी केली असताना आम्हाला बाळा कोळी यांची माहिती मिळाली आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. त्यांनी आम्हाला मंगळसूत्र खोटं असल्याचं सांगितलं. त्यांनी ते सोन्याच्या दुकानातून ३८ हजारांना विकत घेतलं होतं. आम्ही त्या दुकानात जाऊन चौकशी केली आणि ते मंगळसूत्र खोटं असल्याची खात्री केली,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.