मुरबाडमध्ये येऊन गेलेल्या व्यक्तीचा ठाण्यात कोरोनामुळे मृत्यू – कुटुंबातील व्यक्तींनाही लागण, मानीवली गावातील कुटुंबे क्वारंटाईन

मुरबाड: मागील आठवड्यात मुरबाड तालुक्यातील मानीवली गावात येऊन गेलेल्या व्यक्तीचा ठाण्यात कोरोनामुळे मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. सध्या मानीवलीतील कुटुंबे क्वारंटाईन केली

मुरबाड: मागील आठवड्यात मुरबाड तालुक्यातील मानीवली गावात येऊन गेलेल्या व्यक्तीचा ठाण्यात कोरोनामुळे मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. सध्या मानीवलीतील कुटुंबे क्वारंटाईन केली असुन येथील २२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. ठाणे येथे राहणारे व मुळचे मुरबाडचे रहीवासी असलेले मानीवली (व्यापारी) गावी मागील आठवड्यात कुटुंबासह आले होते.गावकऱ्यांनी त्यांना विरोध केल्याने ते दोन दिवस राहुन पुन्हा ठाण्याला गेले.

मागील गुरुवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मंगळवारी रात्री ठाण्याच्या कौशल्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सध्या त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे ते राहुन गेलेल्या मानीवली गावच्या रहिवाशांची झोप उडाली आहे. तालुक्यातही खळबळ माजली आहे.या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या मानीवलीच्या २२ जणांचे स्वॅब नमुने  तपासणीसाठी पाठवले असुन त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. मुरबाड तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, मात्र रेड झोनमधुन येणाऱ्या पाहुण्यांमुळे तालुक्याला कोरोनाची बाधा होऊ शकते, त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन प्रशासनाने आणि ठिकठिकाणच्या ग्रामपंचायत प्रशासनांनी बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांबाबत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी मुरबाडकरांकडून होत आहे.