Mansukh Hiren's body was found there. Another body was found there; Excitement once again in the Mumbra Bay area

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्याच परिसरात आता आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

    ठाणे : ठाण्यातील मुंब्रा खाडी परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या परिसरात दुसरा मृतदेह सापडला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्याच परिसरात आता आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

    सकाळी अकराच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्रांच्या आधारे या व्यक्तीचे नाव सलीम अब्दुल शेख (वय-४८) असे असल्याचे समजते. तसेच हा व्यक्ती मुंब्रा रेतीबंदर परिसरातच राहणारी असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी कार सापडल्यांनतर या कारचा कथित मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. यानंतर वाझेंना अटक करण्यात आली. एनआयए या सर्व प्रकरणी वाझेंची चौकशी करत आहे.