मराठी माध्यमाच्या शाळांच्या इंग्रजी माध्यमात रुपांतरणाला अनुकुलता – भाजपा शिक्षक आघाडीची मागणी मान्य

कल्याण : मराठी माध्यमाच्या शाळांच्या इंग्रजी माध्यामात रुपांतरणाला राज्य सरकारने तत्वतः अनुकुलता दर्शवली असून यासाठी भाजपा शिक्षक आघाडीने मागणी आणि पाठपुरावा केला होता. मराठी शाळांचे इंग्रजी

 कल्याण : मराठी माध्यमाच्या शाळांच्या इंग्रजी माध्यामात रुपांतरणाला राज्य सरकारने तत्वतः अनुकुलता दर्शवली असून यासाठी भाजपा शिक्षक आघाडीने मागणी आणि पाठपुरावा केला होता. मराठी शाळांचे इंग्रजी माध्यमात रुपांतरण हा पालक आणि विद्यार्थ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि प्रतिष्ठेचा विषय असल्यामुळे पालक–शिक्षक या सर्वांना समान न्याय देणारा ठरणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळांनी हा विकल्प स्विकारल्यास विद्यार्थी पट संख्या वाढेल, विद्यार्थ्यांना दर्जेदार, आनंददायी व गुणवत्तापुर्ण शिक्षणाची हमी मिळेल, शाळांशाळांमध्ये स्पर्धानुकुल वातावरण तयार होईल.

भाजपा शिक्षक आघाडीचे विदर्भ विभाग सहसंयोजक अनिल शिवणकर यांच्या संकल्पनेतील या प्रस्तावाला  राज्यसंयोजिका  कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके यांचे  मार्गदर्शन लाभलं. या वास्तवदर्शी निवेदनाची शासनालाही दखल घ्यावीशी वाटली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अनुकूल प्रस्ताव सादर करणेसाठी व कार्यवाहीसाठी अनुकूलता दर्शविली असून शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनीही त्यावर पसंतीची मोहर उमटविली. राज्यसहसंयोजक विकास पाटील यांच्यामते सध्यातरी मराठी शाळांचं रुपांतरण इंग्रजी माध्यमात करणे हाच उपाय सर्वांसाठी उपयुक्त आणि योग्य निर्णय आहे. शिक्षणाक्षेत्रावर दुरगामी परीणाम करणारा ठरेल.  आहे तीच शाळा, आहे तेच इन्फ्रास्ट्रक्चर, आहे तेच अनुदान, आहे तेच वेतन आणि आहे तेच शिक्षक सेवा देणार असल्यामुळे शासनाला वेगळा आर्थिक विचार करण्याची वा वेगळी आर्थिक तरतूद करण्याची  अजिबात गरज भासणार नाही. हा पर्याय सकारात्मकतेने स्विकारल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील बोर्डाशीही स्पर्धा करण्यात आपण कुठेही कमी पडणार नाहीत. शाळांची गुणवत्ता सुधारेल व दर्जाही वाढेल अशी माहिती कोकण विभाग संयोजक एन. एम. भामरे आणि कल्याण जिल्हा संयोजक विनोद शेलकर यांनी दिली.