क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाचा पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपणात पुढाकार

वाडा :निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वेळ द्या, जैवविविधतचे रक्षण आणि संवर्धन करा आणि माणसाला माणुसकीची वागणूक द्या या घोषवाक्याने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर व ठाणे जिल्ह्यातील गाव पाड्यात

वाडा :निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वेळ द्या, जैवविविधतचे रक्षण आणि संवर्धन करा आणि माणसाला माणुसकीची वागणूक द्या या घोषवाक्याने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर व ठाणे जिल्ह्यातील गाव पाड्यात निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाकडून जागतिक  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.या पर्यावरण दिनानिमित स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील चिंचपाडा,आंबेपाडा ,मांडवा, खुपरी  आणि ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी व इतर भागात हा उपक्रम राबविला.त्याचबरोबर कोरोना विरूद्ध मोहिमेत सोशल डिस्टन्सिंग पाळत भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष कार्यकर्त्यांनी निसर्ग संवर्धनाची प्रतिज्ञा यावेळी घेतली.त्याच बरोबर काही ठिकाणी झाडेही लावण्यात आली. ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील महिला वर्ग या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे माहिती या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बळीराम चौधरी यांनी दिली.निसर्गाचा समतोल साधण्यासाठी निसर्गाला वेळ द्या, असेही घोषवाक्य जनतेेच्या मनात रुजविण्यात आले. जंगल भागात होणारी बेसुमार जंगल तोड ही पर्यावरणाला बाधक आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतोय, असे यावेळी मार्गदर्शन केले जात होते.