‘त्या’ नवदाम्पत्याने लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीला केली मदत

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील वैजोळे येथील रवि पाटील व मृणाली पाटील या नवदाम्पत्य लग्नाचा खर्च टाळून ५१ हजार रुपयांचा धनादेश भिवंंडी तहशीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीला दिला.

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील वैजोळे येथील रवि पाटील व मृणाली पाटील या नवदाम्पत्य लग्नाचा खर्च टाळून ५१ हजार रुपयांचा धनादेश भिवंंडी तहशीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे , सोनाळे ग्राम पचायतचे सरपंच विषु म्हात्रे , तानाजी मोरे उपस्थित होते कोरोनाच्या लढात आपलाही खारीचा वाटा असावा, अशा भावनेतून गर्दी टाळत या जोडप्याने हा अनोखा उपक्रम राबविला आहे.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असल्याने वऱ्हाडी मंडळींना एकत्र येणे कठीण झाल्याने जेमतेम मोजक्या नातेवाईकांमध्येच लग्न करणे बंधनकारक होते. त्यातून खर्चही टाळला जात होता. विशेष म्हणजे यातून काही पैशाची बचत होणार होती. त्यासाठी लग्नाच्याच दिवशी दोन्ही बाजूने अगदी मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीनेच लग्न झाले व हे जोडपे विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांनी भिवंडी तालुक्याचे तहसिलदार येथील शशिकांत गायकवाड यांच्याकडे ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला.कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर्स, पोलीस, प्रशासन यांचे मोलाचे योगदान आहे. सामान्य नागरिकांना केवळ घरी बसून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. गर्दी टाळण्यासाठी अगदी मोजक्याच पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच कोरोनाच्या लढ्यात आमचाही खारीचा वाटा असावा, या भूमिकेतून मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय झाल्याचे नवदाम्पत्याने सांगितले.