blast

स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, राबोडी पोलीस निरिक्षक व कर्मचारी, बॉम्ब शोध व निष्कसन पथक दाखल झालेले आहेत. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसली तरी स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

ठाणे : ठाण्यामध्ये राबोडी (Rabodi ) परिसरातील इमारतीमध्ये भीषण स्फोट झाला. सकाळी ८.३०च्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रुममध्ये अचानक स्फोट (Massive blast at a building) झाला. ही रुम गेल्या काही दिवसांपासून बंद होती. प्राथमिक अंदाजानुसार हा स्फोट सिलेंडरमुळे झाला (cause of the blast) असावा. घरात कोणीही नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी झाली आहे.

स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, राबोडी पोलीस निरिक्षक व कर्मचारी, बॉम्ब शोध व निष्कसन पथक दाखल झालेले आहेत. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसली तरी स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. बॉम्ब शोध व निष्कसन पथक कडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.