तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मध्ये असलेल्या सर्वात मोठ्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या T प्लॉट मध्ये असलेल्या T- 141 नंडोलिया ऑर्गेनिक या कंपनीत आज संध्याकाळच्या वेळी भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाचा हादरा बोईसर औद्योगिक क्षेत्राच्या आसपासच्या परिसरातल्या बोईसर, धनानीनगर, चिंचणी, पास्थळ आणि इतर जवळपासच्या भागांत जाणवला. या स्फोटात 4 

जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला आणि यात काही जीवितहानी झाली किंवा नाही ती माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.