डोंबिवलीत सरोज आर्केड इमारतीमध्ये भीषण आग

इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट आणि वायरींगमुळे या इमारतीमध्ये आग लागली आहे. तसेच या घटनेची माहिती अग्नीशमक दलांना मिळाली असता अग्नीशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

डोंबिवली स्थानका (Dombivli Station) जवळील सरोड आर्केड (Saroj Arcade Building) इमारतीमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट आणि वायरींगमुळे या इमारतीमध्ये आग लागली आहे. तसेच या घटनेची माहिती अग्नीशमक दलांना मिळाली असता अग्नीशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.