ठाण्यातील मासुंदा तलाव ओव्हर फ्लो, तलावातील मासे रस्त्यावर

गेले दोन दिवस ठाण्यात कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले असून नागरिक धास्तावले आहेत. परंतु मासुंदा तलाव भरून वाहू लागल्याने काही मासे खाणारे खवय्ये मात्र खुश झाले आहेत. मासुंदा तलाव भरल्याने त्यातील पाणी चक्क शेजारील भाजी मार्केट मध्ये घुसले.

    ठाणे : गेले दोन दिवस ठाण्यात कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले असून नागरिक धास्तावले आहेत. परंतु मासुंदा तलाव भरून वाहू लागल्याने काही मासे खाणारे खवय्ये मात्र खुश झाले आहेत. मासुंदा तलाव भरल्याने त्यातील पाणी चक्क शेजारील भाजी मार्केट मध्ये घुसले.

    दरम्यान काही वेळाने तेथील व्यापाऱ्यांना पाण्यातून आलेले मोठाले मासे दिसताक एकच गलका उडाला व सर्वजण हे मासे पकडण्यासाठी धावपळ करू लागले. हटत पिशव्या घेऊन अनेकजण हे मासे त्यात भरताना दिसत आहेत.