mp vichare visit to masunda lake

अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ठाण्यातील(thane) मासुंदा तलाव(masunda lake) परिसराचा सुशोभीकरण काम संथ गतीने सुरू आहे. धिम्या गतीने सुरू असलेल्या या कामांमुळे सुज्ञ ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे (mp rajan vichare)यांनी सोमवारी सुरू असलेल्या या कामाची पाहणी केली.

ठाणे : अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ठाण्यातील(thane) मासुंदा तलाव(masunda lake) परिसराचा सुशोभीकरण काम संथ गतीने सुरू आहे. धिम्या गतीने सुरू असलेल्या या कामांमुळे सुज्ञ ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे (mp rajan vichare)यांनी सोमवारी सुरू असलेल्या या कामाची पाहणी केली. पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करत उशीर होत असलेल्या कामाबद्दल आढावा घेण्यात आला. दरम्यान काहीही झाले तरी मासुंदा तलाव मार्च महिन्यात लोकार्पण करणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.

मासुंदा तलावाबरोबरच ठाणे शहराच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यावेळी उपायुक्त संजय हेरवाडे नौपाडा -उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त प्रणाली घुंगे, शंकर पाटोळे, नगर अभियंता रवींद्र खडताळे ,उपनगर अभियंता पापळकर कार्यकारी अभियंता रामकृष्ण कोल्हे, मोहन कलाल स्वच्छता निरीक्षक, वृक्ष प्राधिकरणाचे उद्यान निरिक्षक केदार पाटील, प्रदूषण अधिकारी मनिषा प्रधान तसेच मध्य रेल्वेचे ठाणे इंजिनीअरिंग खात्याचे दिलीप कुमार इतर विभागाचे सर्व अधिकारी या दौऱ्याला उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यात खासदार विचारे यांनी सर्वप्रथम महापालिकेने बनविलेल्य ॲम्पिथिएटरची स्वच्छता व सुरक्षा याकडे लक्ष देण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच दिवसातून दोन वेळा याची साफसफाई करण्यात यावी, सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही या ठिकाणी बसविण्यात यावेत असे संबंधितांना आदेश देण्यात आले. त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी अहिल्यादेवी घाटावर कोणती कामे हाती घेण्यात येणार याचा आढावा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या परिसरात केलेल्या कामांच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षकांनी बाहेर केबिन घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दरवर्षी पावसाळ्यात तलाव भरुन तलावाचे पाणी शेजारी असलेल्या बाजारपेठ मध्ये घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. यासाठी खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा करून याठिकाणी अस्तित्वातील गटार तोडून याठिकाणी नवीन मोठे कल्वर्ट बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला या कामाचे लवकरच सुरुवात होणार असून वाहतुकीचे नियोजन कशा पद्धतीने होऊ शकेल याबद्दल चर्चा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्याशी केली.

अधिकाऱ्यांना विचारला जाब

स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅन्डची कामे लवकर मार्गी लावावी. तसेच ठाणे महापालिकेने रेल्वेकडे कल्याण व मुंबई दिशेस धोकादायक असलेल्या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी दिलेल्या रक्कमचे काम येत्या १० डिसेंबर व १५ डिसेंबरला सुरू होणार असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप का सुरू झाले याचा जाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांना गडकरी रंगायतन येथे बोलवून घेऊन विचारले असता त्यांनी आठवडाभरात काम सुरू करू, असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले.

इतर कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश

खासदार राजन विचारे यांनी कोलबाड येथे आपल्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानातील रंगमंचाच्या लोकार्पण साठी आवश्यक असलेली अतिक्रमणे दूर करण्याचे आदेश उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांना देण्यात आले आहे. याची कारवाई उद्यापासून सुरू होईल असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या प्रभागात महिलांच्या रोजगारासाठी नव्याने उभारण्यात आलेली प्रशिक्षण केंद्राची इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे तसेच शहीद उद्यानातील व मखमली तलाव येथील कामांचा आढावा घेऊन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.