कल्याण डोंबिवलीत दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण, २५६ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली असून या दोन नगरसेवकांनी १७ जून रोजी झालेल्या स्थायी समिती सभेस हजेरी लावली होती. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली असून या दोन नगरसेवकांनी १७ जून रोजी झालेल्या स्थायी समिती सभेस हजेरी लावली होती. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत आज पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून गेल्या २४ तासांत २५६ नवे रुग्ण आढळले असून ४ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ११,७६३ स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.  

आजच्या या २५६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३७६७  झाली आहे.  कोरोना रुग्णांच्या एकूण ३७६७  रुग्णांपैकी २०९२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १५९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पालिकाक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना महापालिकेच्या दोन नगरसेवकांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून हे नगरसेवक १७ जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेस देखील उपस्थित होते. यामुळे या सभेस उपस्थित असणाऱ्या इतर लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची आणि या दोन नगरसेवकांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे.  तर सन २०११ च्या जनगणनेनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ असून या दहा वर्षात ३ ते ४ लाखांनी लोकसंख्या वाढली असण्याची शक्यता आहे. असे असतांना २१ जूनपर्यंत पालिकेने केवळ ११,७६३ स्वॅबटेस्ट केल्या आहेत. यापैकी ३५११ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असून ७८६७ टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे आता महापालिकेने जास्तीत जास्त नागरिकांच्या टेस्ट करण्यासोबतच जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.