भिवंडीत रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या हटविण्यासाठी महापौरांनी घेतला पुढाकार, वाहनचालकांचा अडथळा केला दूर

भिवंडी शहरातील ( Bhiwandi City) सर्व मुख्य रस्त्यांसह उड्डाणपुला खालील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या (handcarts)  ,गॅरेज (Garage) व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत नेहमीच ओरड होत असताना महापौर प्रतिभा पाटील (Mayor Pratibha Patil) यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत टपऱ्या, अतिक्रमण दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 भिवंडी : भिवंडी शहरातील ( Bhiwandi City) सर्व मुख्य रस्त्यांसह उड्डाणपुला खालील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या (handcarts)  ,गॅरेज (Garage) व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत नेहमीच ओरड होत असताना महापौर प्रतिभा पाटील (Mayor Pratibha Patil) यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत टपऱ्या, अतिक्रमण दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

वंजारपट्टी नाका येथील उड्डाणपूला खाली मोठ्या प्रमाणावर जागा अडवून टपऱ्या ,हातगाड्या ,गॅरेज व्यासायिका बसले असून यामुळे शहर विद्रुप होत असतानाच नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत शहरातील स्थापत्य अभियंता रविष धूरु यांनी महानगरपालिका महापौर व आयुक्त यांची भेट घेत याबाबत तक्रार करीत असताना येथील अतिक्रमण हटवून हा परिसर सुशोभित करता येऊ शकतो हे दाखवून दिले असता महापौर प्रतिभा पाटील या महानगरपालिका नगररचनाकार श्रीकांत देव,सहाय्यक नगररचनाकार प्रल्हाद होगे पाटील, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, प्रभाग समिती क्रमाक १ चे प्रभाग अधिकारी दिलीप खाने, व ५ चे प्रभाग अधिकारी मारुती गायकवाड, शहर विकास विभाग प्रमुख साकिब खरबे, कनिष्ठ अभियंता (बांधकाम) विनोद भोईर यांसह या संपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईत वांजारपट्टी नाका उड्डाण पुलाखालील व रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, दुकाने व हातगाड्या, बेकायदेशीररीत्या उभी केलेली वाहने हटविण्यात आली.