narmada offshore company

सचिन वाझे प्रकरणात (sachin waze case)रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. याच प्रकरणातील तपास यंत्रणेने हस्तगत केलेल्या ५ गाड्यांपैकी मर्सिडीज बेंझ ही १ गाडी नवी मुंबईतील असल्याचे समोर आले आहे. ही गाडी तुर्भे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर डी २९/५ नर्मदा ऑफशोअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    वाशी: वाझे प्रकरणात(sachin waze) आत्तापर्यंत जवळपास ५ गाड्या तपास यंत्रणांच्या ताब्यात असून त्यापैकी एक गाडी ही नवी मुंबईची असल्याचे आढळून आले आहे. मात्र ज्या कंपनीच्या नावावर ही गाडी आहे त्यांनी मात्र ही गाडी याआधीच विकल्याचा दावा केला आहे. मात्र या वाहनाच्या निमित्ताने मनसुख हिरेन प्रकरणात ठाणे, मुंबईसोबत नवी मुंबईचेदेखील नाव जोडले गेले आहे.

    वाझे प्रकरणातील तपास यंत्रणांपैकी अजून कोणीही कंपनीशी संपर्क साधला नाही. संबंधित तपास यंत्रणांनी पुढे जर संपर्क साधला तर त्यांना कंपनीकडून संपूर्ण सहकार्य असेल.

    - देव भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नर्मदा ऑफशोअर प्रायव्हेट लिमिटेड

    वाझे प्रकरणात रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. याच प्रकरणातील तपास यंत्रणेने हस्तगत केलेल्या ५ गाड्यांपैकी मर्सिडीज बेंझ ही १ गाडी नवी मुंबईतील असल्याचे समोर आले आहे. ही गाडी तुर्भे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर डी २९/५ नर्मदा ऑफशोअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ही गाडी  कंपनीने २०१५ साली विकत घेतली होती. तसेच २१ नोव्हेंबर २०२१ रोजी कार्स २४ ला विकली आहे. या व्यवहाराची सर्व कागदपत्रे कंपनीकडे उपलब्ध असल्याचे नर्मदा ऑफशोअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देव भंडारी यांनी सांगितले.