metro work

मेट्रो भिवंडी शहरातून अंजुरफाटा धामणकर नाका कल्याण नाका मार्गे टेमघर साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार असून या मार्गावरील अतिक्रमण हटविणे, रस्ते रुंदीकरण करण्या बाबत कोणतेही नियोजन महानगरपालिका प्रशासना कडून केले नसल्याने या मार्गा वरून मेट्रो जाणार कशी या बाबत नागरीकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

भिवंडी : ठाणे भिवंडी (Bhiwandi) कल्याण या मेट्रो (Metro) ५ प्रकल्पाची घोषणा केल्या नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आजच्या घडीला ठाणे (Thane) येथून कामास सुरवात होऊन कशेळी पासून ते थेट  भिवंडी शहरातील धामणकर नाका येथ पर्यंत रस्त्यावर बॅरिकेट्स लावून कामास सुरवात झाली, परंतु भिवंडी शहरात काम सुरू झाले परंतु एमएमआरडीए (MMRDA officials) व भिवंडी महानगरपालिका यांच्यात या कामा बाबतीत सुसूत्रता नसल्याने कामा बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

विशेष म्हणजे मेट्रो भिवंडी शहरातून अंजुरफाटा धामणकर नाका कल्याण नाका मार्गे टेमघर साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार असून या मार्गावरील अतिक्रमण हटविणे, रस्ते रुंदीकरण करण्या बाबत कोणतेही नियोजन महानगरपालिका प्रशासना कडून केले नसल्याने या मार्गा वरून मेट्रो जाणार कशी या बाबत नागरीकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

शहरातील रस्त्यांची मागील पाच वर्षात दुरवस्था झालेली असताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष बाब म्हणून भिवंडी शहरातील अंजुरफाटा ते बागे फिरदोस या चार किलोमीटर रस्त्याच्या बांधणी साठी ४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला नंतर २०१७ मध्ये काँक्रीटी रस्ता बनवण्याच्या कामास प्रारंभ झाला .हा रस्ता धामणकर नाका पर्यंत पूर्ण होताच निधी संपल्याने उर्वरित काम बासनात गुंडाळून ठेवण्यात आले परंतु या रस्त्यांचे लोकार्पण ही झाले नाही तोच मेट्रो च्या ठेकेदाराने रस्त्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता खोदाई सुरू केली त्यामुळे या रस्त्यावर खर्चकेलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेला या बाबत जर वेळीच एमएमआरडीए ,महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समयसूचकता दाखविली असती तर हा जनतेचा निधी नक्कीच वाचविता आला असता असा सूर नागरीकां मधून उमटत आहे .

या कामाच्या ठिकाणी मेट्रोच्या ठेकेदारांनी मोठ्या वजनाचे लोखंडी बॅरिकेट्स उभी केल्याने रस्ता अरुंद झाल्याने धामणकर नाका ते अंजुरफाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना ठेकेदारांनी ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक उभे करणे गरजेचे आहे नाहीतर रस्त्यावरील बॅरिकेट्स पडून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मेट्रो मार्गात धामणकर नाका उड्डाणपूल येेत असून सदरचा उड्डाणपूल उभारण्यासाठी घेतलेले एमएमआरडीए चे कर्ज महानगरपालिकेच्या डोक्यावर असतानाच त्यावर हातोडा चालवावा लागणार आहे ,तर कल्याण रोड या ठिकाणी उड्डाणपूल उभारणीस सुरवात झाली नसतानाच मेट्रो ची घोषणा झाली परंतु त्या बाबतीत ही नियोजन न केल्याने या मार्गावरील व्यावसायिक ,निवासी गाळेधारक रस्ता रुंदीकरणास विरोध करीत असताना त्यांचे समाधान ही आज पर्यंत झाले नसल्याने शहरात सुरू झालेले मेट्रो चे काम पुढे कसे नेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.