MIDC's pipeline ruptured on Kalyan Sheel Road, destroying millions of liters of water

ना पाऊस, ना पाणी तरीही कल्याणकरांना शनिवारी पुर स्थितीचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या या पुरामुळे कल्याणकरांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याण शीळ रोड वर एमआयडीसीची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. यामुळे वाहनचालकांना पाण्यातून प्रवास करावा लागला. येथे तैनात असेलेले पोलिसही पाण्यात उभ राहूनच वाहनाचालकांना वाट दाखवत होते(MIDC's pipeline ruptured on Kalyan Sheel Road, destroying millions of liters of water).

    कल्याण : ना पाऊस, ना पाणी तरीही कल्याणकरांना शनिवारी पुर स्थितीचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या या पुरामुळे कल्याणकरांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याण शीळ रोड वर एमआयडीसीची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. यामुळे वाहनचालकांना पाण्यातून प्रवास करावा लागला. येथे तैनात असेलेले पोलिसही पाण्यात उभ राहूनच वाहनाचालकांना वाट दाखवत होते(MIDC’s pipeline ruptured on Kalyan Sheel Road, destroying millions of liters of water).

    कल्याण शीळ रोड वरील खिडकाळी मंदिरा जवळ असेलली एमआयडीसीची 1772 मिमी व्यासाची पाईपलाईन शनिवारी सकाळच्या सुमारास फुटली. या पाईप लाईन मधून नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. यावेळी पाण्याचा दाब प्रचंड असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

    पूर्ण परिसर जलमय झाला असून कल्याण ते शिळ रोड वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली. मात्र, वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक करत आहे.