वाडा तालुक्यात अडकलेले ओडिसा आणि तेलंगणा राज्यातील मजूर रेल्वे आणि बसमधून रवाना

वाडा: पालघर जिल्ह्यातील पालघर स्टेशनवरून वाडा तालुक्यात लॉकडाऊन काळात अडकलेल्या २०२ मजुरांना आज ओरिसा रेल्वेने सोडण्यात आले. लॉकडाऊनच्या वेळी हे मजूर वाडा तालुक्यातील कुडूस येथे नाका कामगार

वाडा: पालघर जिल्ह्यातील पालघर स्टेशनवरून वाडा तालुक्यात लॉकडाऊन काळात अडकलेल्या २०२ मजुरांना आज ओरिसा रेल्वेने सोडण्यात आले. लॉकडाऊनच्या वेळी हे मजूर वाडा तालुक्यातील कुडूस येथे नाका कामगार होते.त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होती, अशी माहिती वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली. त्याचप्रमाणे आज वाडा तालुकयातील वसुरी येथे अडकलेले कॅम्पमधील २६ मजुर हे वाडा येथून एस टी बसने तेलंगणा राज्यात रवाना करण्यात आले. यावेळी वाडा प्रांत अर्चना कदम ,तहसीलदार उध्दव कदम, नायब तहसिलदार लहांगे, रिताली परदेशी तसेच मंडळ अधिकारी, तलाठी यांनी मोलीची मदत केली. वाडा तालुक्यातील अजून काही अडकलेल्या मजुरांना पाठविण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली.