परराज्यातील मजूरांच्या आरोग्य तपासणीबाबत कल्याणमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

टिटवाळा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर आणि नागरिकांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याची तयारी शासनाने सुरु केली असून त्याअनुषंगाने आज कल्याण

टिटवाळा:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर आणि नागरिकांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याची तयारी शासनाने सुरु केली असून त्याअनुषंगाने आज कल्याण उपविभागीय अधिकारी नितीन महाजन यांच्या कार्यालयात या मजूरांना  त्यांच्या गावी पाठविण्या संदर्भात शासकीय यंत्रणेला मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसीलदार दीपक आकडे, गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कापूसकर तसेच तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेक भागात परराज्यातून आलेले मजूर व नागरिक अडकून पडले आहेत. शासनाने यांच्या साठी कम्युनिटी किचनची सोय केली आहे परंतू अजून त्यांचे काही गावांमध्ये हाल होत आहेत. त्यांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे. त्यामुळे यांना त्यांच्या गावी पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कल्याण तालुक्याचा विचार केला तर बांधकाम व इतर अनेक कामानिमित्त बहुसंख्येने मजूर व लोक म्हारळ वरप कांबा, रायते, खडवली, गोवेली, टिटवाळा परिसर आदी परिसरात आलेले होते. त्यामुळे यांना त्यांच्या राज्यात /गावात पाठविण्या अगोदर काय काळजी घ्यायची यांचे मार्गदर्शन सोमवारी कल्याण प्रांताधिकारी नितीन महाजन यांनी आपल्या कार्यालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी,मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक आदींना केले.यामध्ये परराज्यातील जिल्हाधिकारी यांनी या मजूरांना व नागरिकांना  घेण्यास अनुकूलता दर्शविली तर अशा मजूर व नागरिकाची आरोग्य तपासणी, नोंदणी करून जे फिट असतील त्यांनाच पाठविले जाईल तर अनफिट लोकांना येथेच राहावे लागेल.

खडवली, गोवेली, म्हारळ, वरप, कांबा येथे यूपी, बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश आदी राज्यातील मजूर व नागरिक असल्याने प्रथम प्राधान्याने म्हारळ येथे यांची आरोग्य तपासणी कॅम्प लावण्यात येणार असून दोन दिवस चालणार आहे या परिसरात साधारणपणे ३  हजारच्या आसपास पर राज्यातील नागरिक असल्याचे कल्याण प्रांताधिकारी नितीन महाजन यांनी सांगितले. तसेच यांनतर खडवली भागातही असे कॅम्प घेऊन मजूरांना त्यांच्या गावी पाठविण्याची सोय करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या बैठकीला कल्याण तहसीलदार दीपक आकडे, गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कापूसकर, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. त्यामुळे या परिसरातील परराज्यातील मजूर व नागरिकांनी आरोग्य तपासणी कॅम्प मध्ये येऊन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे.