स्थलांतरीत मजुरांनी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पालघर : पालघर जिल्हयात असलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जायचे असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास

पालघर : पालघर जिल्हयात असलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जायचे असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. तसेच पालघर जिल्हयातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात स्थलांतरीत मजुरांच्या बाबतीत मदत कक्ष तयार करण्यात आले आहेत. स्थलांतरीत मजुरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.६/२०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या  कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या नोंदणीसाठी https://migrant.mahabocw.in/migrant/form हे संकेतस्थळ तयार केले आहे. त्यामुळे पालघर जिल्हयातले जे स्थलांतरीत मजूर त्यांच्या राज्यात जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.