It is the responsibility of the state government to get reservation for the Maratha community, no one should do politics: Eknath Shinde

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पुर्ण करणाऱ्या एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी त्या विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्रासाठी ठाण्यात भूखंड देण्यास अंतिम मंजूरी दिल्याने एकप्रकारे गुरुदक्षिणा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान,ठाणे महापालिका आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठामध्ये या संदर्भात करार होऊन हा प्रस्ताव मार्गी लागणार असल्याने ठाणे शहरात मुक्त विद्यापीठाच्या केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे.

वसंत चव्हाण, ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातुन(yashwantrao chavhan open university) पदवीधर झाले.पदवीचे शिक्षण पुर्ण करणाऱ्या एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी मुक्त विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्रासाठी ठाण्यात भूखंड देण्यास अंतिम मंजूरी दिल्याने एकप्रकारे गुरुदक्षिणा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान,ठाणे महापालिका आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठामध्ये या संदर्भात करार होऊन हा प्रस्ताव मार्गी लागणार असल्याने ठाणे शहरात मुक्त विद्यापीठाच्या केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्रासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात नि:शुल्क भूखंड मिळवण्याची विनंती केली होती.विद्यापीठाच्या या मागणीला राज्याच्या नगरविकास विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.२८ ऑगस्ट २०१९ रोजी भुखंड देण्यासाठी अटी शर्थी निश्चित करून हा प्रस्ताव राज्य शासनाकडूनही मंजुर करण्यात आला. त्यानुसार, ठाणे महापालिका हद्दीतील १५०० चौ.मी. जागा ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.शहरातील शैक्षणिक प्रयोजनार्थ आरक्षित असलेल्या भूखंडाच्या उपलब्धतेनुसार ही जागा विद्यापीठास देण्यास राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आल्याने ठाण्यातील मुक्त विद्यापीठाचा विस्तार होणार आहे.

भुखंडावर बांधकाम विद्यापीठास स्वखर्चाने करावे लागणार असून त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी शर्थींमध्ये दोन वर्षांमध्ये विद्यापीठ कार्यान्वित करावे लागणार आहे. तर सहा महिन्यात प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात करावी लागणार आहे. विद्यापीठाने चांगले काम केल्यास १५ वर्षांसाठी हा मुदतवाढीचा प्रस्ताव फेरमंजुरीसाठी घ्यावी लागणार आहे. अटीशर्थी भंग झाल्यास हा करार रद्द करण्यात येणार आहे.