thane missing ca sagar deshpande

कल्याण : ठाण्यात नौपाडा येथे राहणारे एक सीए ११ तारखेपासुन बेपत्ता(missing CA of thane found dead at titwala) झाले होते. त्याचा मृतदेह टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक रेल्वे रूळालगत आढळल्याने त्याच्या मृत्युचे गूढ निर्माण झाले आहे.

कल्याण : ठाण्यात नौपाडा येथे राहणारे एक सीए ११ तारखेपासुन बेपत्ता(missing CA of thane found dead at titwala) झाले होते. त्याचा मृतदेह टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक रेल्वे रूळालगत आढळल्याने त्याच्या मृत्युचे गूढ निर्माण झाले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नौपाडा येथे राहणारे सागर सुहास देशपांडे  हे मुंबईतील ‘कॉक्स् ॲन्ड किंग्ज या आंतरराष्ट्रीय टुर्स कंपनीत लेखापालाचे काम पाहत होते. या कंपनीच्या तब्बल चार हजार कोटीच्या घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात आल्याचे समजते. सागर देशपांडे हे ११ऑक्टोबर रोजी टिटवाळ्याला जाऊन येतो असे सांगून एम् एच ०४- जी एम् -३५१५ या मोटार कारने कंपनीच्या टिटवाळा येथील कार्यालयाकडे गेल्याचे पुढे येत आहे. त्यांच्या घरच्यांनी ते बेपत्ता असल्याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली.

सागर देशपांडे यांचा मृतदेह १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास टिटवाळा स्टेशन नजीक रेल्वे रुळालगत आढळल्याने हा अपघात, घात की आत्महत्या असे गूढ निर्माण झाले आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अकस्मित मुत्युची मृत्युची नोंद क्रं१२३नु १२ ऑक्टोबर असुन लोहमार्ग पोलीसांनी मृतदेहाची ओळख पटण्याकामी सुत्रे हालवली असता १७ ऑक्टोबर रोजी नौपाडा पोलिसांनी हा बेपत्ता सागर देशपांडे यांचा मृतदेग असल्याबाबत दुजोरा दिला. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी सागर देशपांडे मुतकाच्या वारसाचे जबाब नोंद घेणे सुरु केले आहे. तसेच सागर यांची व्हेगनर गाडी टिटवाळा रेल्वे स्थानकालगत आढळल्याबाबत तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस वाल्मिक शार्दुल यांनी  सांगितले.