missing girl found in thane

ठाण्याच्या(thane) पालिका मुख्यालयाच्या समोरील कचराळी तलावाच्या गार्डनमध्ये एक ८ वर्षांची मुलगी हरवली होती. या हरविलेल्या मुलीला नौपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यासाठी जागरूक पत्रकार यतीन पवार यांनी पोलिसांना मदत केली.

ठाणे : ठाण्याच्या(thane) पालिका मुख्यालयाच्या समोरील कचराळी तलावाच्या गार्डनमध्ये एक ८ वर्षांची मुलगी हरवली होती. या हरविलेल्या मुलीला नौपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यासाठी जागरूक पत्रकार यतीन पवार यांनी पोलिसांना मदत केली.

सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कचराळी तलाव गार्डनमध्ये गेलेले पत्रकार यतीन पवार यांनी लोकांच्या गराड्यात ८ वर्षीय मुलीला पाहिले. घाबरलेल्या अवस्थेतील मुलीला धीर देत पत्रकार पवार यांनी नौपाडा पोलीसांना याविषयी सांगितले. घटनास्थळी त्वरित पोलीस शिपाई लहाने,पोलीस शिपाई बेंडकोळी , सहाय्यक पोलीस शिपाई सुर्वे आले. त्यांनी मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन तिला दिलासा दिला. मुलीकडून त्यांनी राहण्याचा पत्ता आणि तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर मुलीच्या पालकांना बोलावून मुलीला त्यांच्या स्वाधीन केले.