bjp protest for temple opening

कल्याण : भाजपकडून(bjp) सरकारकडे मंदिरे उघडण्याची मागणी(demand to open temples) करत ठिकठिकाणी आंदोलने(protest) करण्यात आली. कल्याण पूर्वेतदेखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी तिसगाव येथील जरीमरी देवी मंदिरासमोर घंटानाद करत ठिय्या आंदोलन केले.

कल्याण : भाजपकडून(bjp) सरकारकडे मंदिरे उघडण्याची मागणी(demand to open temples) करत ठिकठिकाणी आंदोलने(protest) करण्यात आली. कल्याण पूर्वेतदेखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी तिसगाव येथील जरीमरी देवी मंदिरासमोर घंटानाद करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी सरकारने बियर बार आणि अवैध धंदे सुरू केले मात्र मंदिरे उघडली नाहीत. मंदिर आणि जिम लोकांची गरज आहे मात्र सरकार फक्त स्वतःचे घर चालवण्यासाठी बार आणि अवैध धंदे सुरू केले असल्याचा आरोप केला तसेच यावेळी लवकारात लवकर मंदिरे उघडण्याची मागणी केली.

यावेळी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे, जरीमरी सेवा मंडळ अध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.