… आणि अडकून पडलेली संसाराची रिक्षा पुन्हा स्टार्ट झाली, असं मिळालं विनातारण कर्ज

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने रिक्षा सुरु झाल्यात. पण संपूर्ण रिक्षा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे रिक्षा चालकही बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक अडचणी आणि आर्थिक अडचणी जाणवत असल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी टीजेएसबी बँकेच्या संचालक मंडळाशी चर्चा करून गरजू रिक्षा चालकांना ५० हजाराचे विनातारण कर्ज मिळवून दिले.

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव, बंद पडलेली रिक्षा, रिक्षाचे थकलेले हप्ते, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च अशा आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षा चालकांना भाजप आमदार संजय केळकर यांनी आर्थिक मदतीचा हात दिल्याने चिंतेत असलेल्या रिक्षा चालकांना उभारी मिळालेली आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने रिक्षा सुरु झाल्यात. पण संपूर्ण रिक्षा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे रिक्षा चालकही बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक अडचणी आणि आर्थिक अडचणी जाणवत असल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी टीजेएसबी बँकेच्या संचालक मंडळाशी चर्चा करून गरजू रिक्षा चालकांना ५० हजाराचे विनातारण कर्ज मिळवून दिले. डबघाईला आलेल्या अवस्थेत मदतीचा हात दिल्याने आ. केळकर यांचे आभार रिक्षा चालकांनी मानले आहेत.

मार्च महिन्यापासून रिक्षा चालकांच्या व्यवसायावर गदा आली. रोजची मिळकत बंद पडल्याने रिक्षाचे हप्ते, रोजच्या खाण्यापिण्याचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न  ते अनेक प्रश्न उपस्थितीत झाल्याने  रिक्षा चालकांना आर्थिक मदतीची गरज होती. ती विनातारण ५० हजाराचे कर्ज देऊन त्यांना मदत केली.