मुलांना नाहक दिला जातोय त्रास – आमदार प्रताप सरनाईक नाराज ?

ईडीने (अंमलबजावणी संचलनालय )(ED) छापा टाकल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक(pratap sarnaik) यांची या प्रकरणात दमछाक झाली आहे. त्यातच मुलांनाही नाहक त्रास दिला जात असल्यामुळे सरनाईक नाराज असल्याचे समजते.

वसंत चव्हाण, ठाणे : ईडीने (अंमलबजावणी संचलनालय )(ED) छापा टाकल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक(pratap sarnaik) यांची या प्रकरणात दमछाक झाली आहे. त्यातच त्याच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही मुलांना देखील या प्रकरणात नोटीस(notice) तसेच चौकशीला ईडीने बोलावणे धाडले असल्याने याचा नाहक त्रास प्रताप सरनाईक यांना झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान राजकारण करताना विनाकारण आपल्या मुलांना त्रास झाला असल्याने सरनाईक मनात एकप्रकारे नाराज असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.लोकप्रतिनिधी म्हणून ईडीच्या प्रकरणात अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हवी ती मदत मी करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याआधी सांगितले, मात्र उगाचच मुलांना होणाऱ्या त्रासाबद्दल सरनाईक नाराज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर आणि कार्यालयावर ईडीने २४ नोव्हेंबर रोजी छाप टाकला होता. आमदार प्रताप सरनाईक हे यावेळी मुंबई बाहेर असताना त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने मुंबई येथे नेण्यात आले होते. दरम्यान सरनाईक मुंबईमध्ये आले असता त्यांनी आपल्या घरी जाऊन मुलांची विचारपूस केली.

आमदार प्रताप सरनाईक गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ राजकारण असताना त्यांनी अनेक संकटे अंगावर घेतली आहेत. अनेक संकटाचा सामना करत त्यांनी आपले नाव राजकारणात टिकून ठेवले आहे. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश करून आमदारकी प्राप्त केली. रिक्षा तसेच भूर्जी-पावच्या गाडीपासून त्यांनी सुरुवात केली. कठीण परिस्थितीत देखील त्यांनी आपले राजकीय स्थान भक्कम केले. त्यानंतर हळूहळू व्यावसायिक म्हणून सरनाईक म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. मात्र आता भाजप विरोधी भूमिका घेत असताना ईडीने त्यांना आणि त्याच्या मुलांचा पाठलाग केला असल्याने मुलांना होणाऱ्या त्रासामुळे प्रताप सरनाईकांच्या मन दुखावेल असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

ईडीची पिडा टळेल की नाही ?

क्वारंटाईन कालावधी संपल्यावर नंतर सरनाईक कुटूंबियांनी सिद्धिविनायक मंदिर गाठले होते. ईडची पिडा टळूदे यासाठी सहकुटुंब गणपतीला साकडे घातले होते. असे असले तरी दिवसेंदिवस बाहेर येणाऱ्या नवीन प्रकरणामुळे ईडीची पिडा टळेल की नाही ? हे आताच सांगता येणार नाही.

शून्यातून जग निर्माण करणारे प्रताप सरनाईक

नाजूक परिस्थितीत असताना डोंबिवलीमध्ये त्यांनी शून्यापासून सुरुवात केली. त्यानंतर ठाण्यात येऊन परिवहन सदस्य, नगरसेवक त्यानंतर आमदार अशी विविध पदे भूषवली. त्याच्या निवडणुकीच्या प्रचारात शून्यातून जग निर्माण करणारे प्रताप सरनाईक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून असल्याचे कार्यकर्ते सांगत होते. मात्र आता ईडीच्या प्रकरणात मुलांना होणाऱ्या त्रासाला हेच सरनाईकांना नाराज असल्याचे बोलले जात आहे.