२७ गावातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण, आवश्यक साहित्य द्या – मनसे आमदार राजू पाटील यांचे पालिका आयुक्तांना पत्र

कल्याण : कोरोनाचे प्रमाण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि परिसरामध्ये वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २७ गावातील अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारीदेखील युद्धपातळीवर काम

 कल्याण :  कोरोनाचे प्रमाण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि परिसरामध्ये वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २७ गावातील अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारीदेखील युद्धपातळीवर काम करीत आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा देताना मास्क, हॅन्डग्लोज, मास्क,सॅनिटायझर तसेच इतर आवश्यक साहित्य अपुऱ्या स्वरूपात मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण व इतर अत्यावश्यक साहित्य देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.  

महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा जाहीर केला आहे. अशा प्रकारचा विमा संरक्षण या कर्मचाऱ्यांनाही देण्यात यावे. इतर महानगरपालिकेमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व सफाई कर्मचाऱ्यांना ३०० रुपये अतिरिक्त भत्ता देण्यात येतो तसा २७ गावातील कर्मचाऱ्यांनाही देण्यात यावा. मास्क,हॅन्डग्लोज, सॅनिटायझर व इतर साहित्य दररोज देण्यात यावे. अत्यावश्यक सेवा देताना एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यास त्याचा वैद्यकीय खर्च व त्याला पूर्ण पगार देण्यात यावा. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या कर्मचार्यांचा इतर रहिवाशांशी नेहमी संबंध येत असतो त्यामुळे या सर्वांची कोव्हिड-१९ चाचणी करण्यात यावी, अशा मागण्यांचे पत्र मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.