शालेय शैक्षणिक शुल्क कमी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची प्रेसिडेन्सी स्कूलवर धडक

भिवंडी : राज्यातील कोरोना आजाराच्या फैलावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संक्रमण विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये यासाठी राज्य शासनाने सर्व शाळा,

भिवंडी : राज्यातील कोरोना आजाराच्या फैलावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संक्रमण विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये यासाठी राज्य शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच उद्योग,व्यवसाय व कामधंदा बंद असल्यामुळे बहुतांशी पालकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे.असे असताना भिवंडीतील प्रेसिडेन्सी स्कूल व्यवस्थापनाकडून विद्यार्थी, पालकांकडून चालू शैक्षणिक वर्षाची फी एकरकमी रोखीच्या स्वरुपात जबरदस्तीने वसूल केली जात आहे. तसेच तीन महिने इतर शैक्षणिक सुविधा जसे बस भाडे, जेवणाच्या मेसचे भाडे याचे देखील  शाळा व्यवस्थापनाकडून शुल्क आकारले जात असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांना मिळाली असता त्यांनी स्थानिक पदाधिकारी विभाग अध्यक्ष गिरीश देव, उपशहराध्यक्ष महेश मिरजे, विशाल कांबळे, वंशी वडलाकोंडा आदींना सोबत घेऊन तात्काळ शाळा प्रशासनासोबत पत्र देऊन त्यांना जाब विचारण्यासाठी थेट शाळेत धडक दिली व शैक्षणिक वर्ष २०१९-२० व २०२०-२१ मधील देय व शिल्लक फी एकदाच न घेता प्रत्येक महिन्यानुसार किंवा त्रैमासिक घ्यावी तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोणतीही फी वाढ करू नये व पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षात बस भाडे, मेस भाडे व इतर सुविधा खर्च कसा कमी करता येईल याविषयी चर्चा पालक , शिक्षक समितीमध्ये करण्यात यावी आदी सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.त्यावर शाळा प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची माहिती मनविसेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी दिली आहे .