फी सक्ती संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शाळांना निवेदन- कल्याणमधील शाळांमध्ये जाऊन केली चर्चा

कल्याण : कल्याणमधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे कल्याण पूर्वेतील सर्व शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची फी संदर्भात तसेच पालकांच्या आलेल्या समस्यांबाबत चर्चा करून कल्याण पूर्वेतील

 कल्याण : कल्याणमधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे कल्याण पूर्वेतील सर्व शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची फी संदर्भात तसेच पालकांच्या आलेल्या समस्यांबाबत चर्चा करून कल्याण पूर्वेतील शाळांना निवेदन देण्यात आले. शाळा व्यवस्थापनाने सुद्धा योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद असून अनेकांचे कामधंदेदेखील बंद आहे. अशातच काही खाजगी शाळांकडून विद्यार्थांना फी भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाने देखील आदेश काढत शाळांनी विद्यार्थ्यांना फी सक्ती न करण्याचे आदेश दिले आहेत.  असे असतानादेखील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सक्ती केली जात होती. ही बाब मनविसे शहर उपाध्यक्ष सतीश उगले आणि विभाग अध्यक्ष प्रणव देसाई यांना समजताच त्यांनी कल्याण पूर्वेतील सर्व शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांना फी सक्ती करू नये याबाबत चर्चा करत निवेदन दिले. यावेळी सर्व शाळांनी मनविसेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनविसे शहर उपाध्यक्ष सतीश उगले, विभाग अध्यक्ष प्रणव देसाई, उपशहर अध्यक्ष अंकुश राजपूत, उपविभाग अध्यक्ष प्रवीन गायकवाड, उपशाखा अध्यक्ष कपिल शिर्सेकर, मनसे शाखा अध्यक्ष अनिकेत गायकवाड तसेच मनसैनिक पंकेश भुसे, एकांश पवार, रूशभ पवार, रीतेश हडकर उपस्थित होते.