mns traffic week

डोंबिवली : कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेत आजपासून ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या आठवड्याभरात मनसेने नेमलेले ३० वॉर्डन कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम पार पाडणार आहेत.

डोंबिवली : कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेत आजपासून ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या आठवड्याभरात मनसेने नेमलेले ३० वॉर्डन कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम पार पाडणार आहेत.(mns appointed 30 wardens to solve kalyan- shil road traffic issue) सत्ताधाऱ्यांकडून काही उपाययोजना केली जात नसल्याने मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी चार ते पाच तास अडकून राहतात. रेल्वे सेवा बंद असल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या भागातून हजारो चाकरमानी ठाणे, नवी मुंबई, मुंबईला कामाला जातात. त्यांचा जास्त वेळ हा शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीतच जातो.कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी काँक्रिटीकरण सुरु आहे. या कामाच्या कंत्राटदाराकडून सुरक्षिततेचे योग्य नियम पाळले जात नाहीत. त्याचा प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा फटका बसत आहे.

कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील हे स्वत:हून रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वाहतूक कोंडी प्रकरणी वाहतूक पोलिसांना चांगले फैलावर घेतले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या मनुष्यबळ कमी आहे, वॉर्डनची संख्या कमी आहे, मागणी करुन ही वॉर्डन मिळत नाही, अशी अडचण पोलिसांनी सांगितली होती.कल्याण शीळ रस्त्यावर अवजड वाहनांना पोलीस वाहन चालकाकडून पैसे घेऊन सोडतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते.

पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता पाहता मनसेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मनसेचे या रस्त्यावर आजपासून ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या सप्ताहात मनसेच्यावतीने ३० वॉर्डन शीळ ते पलावा दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतील. हे वॉर्डन सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करणार असल्याचे मनसेचे पदाधिकारी यांनी सांगितलं.