murbad hospital

मुरबाड: रूग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण दगावण्याची भीती दाखवून उपचारासाठी दहा हजार रुपये उकळणाऱ्या मुरबाडच्या सरकारी ग्रामीण रुग्णालयातील डॉ.नरहरी फड याच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने(no action on doctor narhari fad) मनसेने गुरुवारी प्रशासनाविरोधात उपोषणास बसण्याचा(mns strike in murbad) निर्णय घेतला आहे.याबाबत मनसेचे शहर उपाध्यक्ष विलास हुमणे यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नरहरी फड याने एका महिलेवर उपचार करण्यासाठी तिच्या नातेवाईकांकडून दहा हजार रुपये घेतल्याचे प्रकरण मनसेने उजेडात आणले होते.याबाबतचे पुरावेही त्यांनी आरोग्य प्रशासनाला सादर केले आहेत. मात्र नंतरही फड याच्यावर कारवाई नं करता त्याची सोयीच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.त्यामुळे याप्रकरणी संशय बळावला आहे.

डॉ.फड हे सात ते आठ महिन्यांपूर्वी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते.मात्र प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवतीना तसेच गंभीर रुग्णांना शासकीय संदर्भ सेवा पुरवण्याऐवजी खाजगी दवाखान्याचा रस्ता दाखवणे अशा अनेक त्याच्या विरोधात तक्रारी असल्याने त्यांची उचलबांगडी म्हसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.असे असतांनाही आर्थिक लुटीची ‘चटक’ लागलेल्या फडने आपली वर्णी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात लावून घेतली.

ज्या ठिकाणी डॉ.फड याच्या कारभाराविरोधात तक्रारींचा ढीग असताना त्याची पुन्हा मुरबाड येथेच प्रतिनियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दहा हजार रुपयांचे हे प्रकरण उजेडात येऊनही दिड महिन्यांनंतरही कोणतीच कारवाई नं झाल्याने वरिष्ठ अधिकारी या कारभाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. गुरुवारी मनसे पदाधिकारी याविरोधात मुरबाड पंचायत समितीसमोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.