mns protest for jameel sheikh case

गेल्या सोमवारी राबोडी परिसरात भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख याच्या डोक्यात गोळी झाडली.(jameel sheikh murder case) हत्येचे नेमके कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने आज मूक धरणे आंदोलन(mns mute protest) करण्यात आले. तसेच या प्रकरणाचा सूत्रधार राबोडीमधलाच असून त्याला अटक करा,अशी मागणी करण्यात आली.

ठाणे: मनसेचे(mns) विभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येचा(jameel sheikh murder case) मास्टरमाईंड हा राबोडीमधलाच असून त्याला तात्काळ अटक करा,अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेकडून ‘मूक धरणे आंदोलन’ करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी तसेच राबोडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या सोमवारी राबोडी परिसरात भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख याच्या डोक्यात गोळी झाडली. घटनास्थळीवरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका आरोपीला पकडण्यात आले असून हत्येचे नेमके कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले असून जमील शेखचा खून हा क्लस्टर विरोधातून झाला आहे. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, या हत्येचे षडयंत्र राबोडीतच घडले असून मुख्य सूत्रधार ही राबोडीचा आहे. असा आरोपदेखील यावेळी मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.

भररस्त्यात झालेल्या हत्येने राबोडी परिसरात तणाव निर्माण झाला होता. हत्येमागचे कारण राजकीय आहे की व्यावसायिक याबाबत ठाण्यात चर्चा रंगली असून या हत्येमागचा मास्टर माईंड हा बाहेरचा नसून राबोडी परिसरातीलच आहे असा आरोप करत पोलिसांनी या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.