मनसे नेते नांदगावकर
मनसे नेते नांदगावकर

नोव्हेंबर महिन्यात राबोडीत भररस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी दुचाकीवरून जाणाऱ्या मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख याची दुचाकीवरील आलेल्या दोघांनी अगदी जवळून डोक्यात गोळी मारून हत्या केली होती. या प्रकरणी अद्याप मुख्य आरोपी हे अटक न झाल्याने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोमवारी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत मृतक जमील शेख याचे कुटुंबीयांनी होते. 

  • मृतक जमील शेखचे कुटुंबीय होते सोबत 

ठाणे (Thane). नोव्हेंबर महिन्यात राबोडीत भररस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी दुचाकीवरून जाणाऱ्या मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख याची दुचाकीवरील आलेल्या दोघांनी अगदी जवळून डोक्यात गोळी मारून हत्या केली होती. या प्रकरणी अद्याप मुख्य आरोपी हे अटक न झाल्याने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोमवारी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत मृतक जमील शेख याचे कुटुंबीयांनी होते.

मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख याच्या हत्येनंतर राबोडी परिसरात तणाव निर्माण झाला होता. राबोडी पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपीना बेड्या ठोकलेल्या नाहीत. दरम्यान हत्या होऊन दोन महिने उलटले मात्र आरोपी अजूनही मोकाट असल्याने सोमवारी ठाण्यात आलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. हत्येच्या फॉलप बाबत मृतक जमील शेख याच्या कुटुंबीयासमोर सविस्तर चर्चा केली. पोलीस आयुक्त आणि मनसे नेते यांच्यात काय चर्चा झाली याबाबत नांदगावकर यांनी आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झालेली असून पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असलयाचे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.