raju patil

दिवावासीयांचा फक्त निवडणुकीपुरता वापर केला जातो. काम न करता फाईली बनवून बिल काढली जातात. या सर्व कामाच्या फायली मी ओपन करणार आणि दाखवून देणार दिव्याखाली किती अंधार आहे, अशा शब्दात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील(mns mla raju patil challenge to shivsena) यांनी सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

ठाणे : दिवा शहर(diva city) हा कायम दुर्लक्षित राहिले असून आजही दिवावासीय उपेक्षितच आहेत. दिवावासीयांचा फक्त निवडणुकीपुरता वापर केला जातो. काम न करता फाईली बनवून बिल काढली जातात. या सर्व कामाच्या फायली मी ओपन करणार (all files will be open)आणि दाखवून देणार दिव्याखाली किती अंधार आहे, अशा शब्दात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील(mns mla raju patil challenge to shivsena) यांनी सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली. दिवा शहराच्या पायाभूत सुविधांच्या संदर्भात बुधवारी राजू पाटील यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

गेली अनेक वर्षे दिव्याखाली अंधारच असून दिव्याकडे आतापर्यंत फक्त डम्पिंग ग्राउंड म्हणूनच पाहिले जात असल्याची टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. सत्ताधारी तसेच प्रशासन या दोघांचाही दिव्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कधीच दिसून आला नसून निवडणुकीत फक्त घोषणा केली जात असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून कामाच्या नावाने निविदा काढल्या जातात ठाणे महानगरपालिकेत असलेल्या सत्ताधारी शिवसेनेवर टीका करत थेट शिवसेनेला एकप्रकारे राजू पाटील यांनी आव्हान दिले आहे. कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार यांनी त्यांच्या मतदार संघातील दिवा शहराबाबत अनेक विषयांवर ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली आणि असमाधानकारक कामांबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच दिवा शहरात झालेल्या कामा बद्दल लवकरच आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती देखील पाटील यांनी यावेळी दिली.

येत्या काही महिन्यात ठाणे महापलिकेची निवडणूकीची घोषणा होणार असून विधानसभेत निवडकीत जसे यश मिळाले तसेच यश मनसे महापलिका निवडणूक मिळवणार आहे. स्थानिक आमदार म्हणून दिव्यात उत्तम काम करून दाखवणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काही महिन्यात दिव्यात स्थान भक्कम करणार असल्याचे यावेळी आमदार राजू पाटील यांनी सांगितले.