raju patil

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर बांधकाम( Illegal Construction In Kalyan Dombivali)सुरू असून कारवाई दाखवण्यासाठी एखादी इमारत पाडली जाते इतकेच नाही तर अधिकृत बांधकामाचेही फूटामागे ७५ रुपये घेतले जातात अशी चर्चा असल्याचा गंभीर आरोप मनसे आमदार राजू पाटील(Raju Patil) यांनी केला आहे.

    बेकायदा बांधकामासाठी(Illegal Construction) लाखो रुपये घेऊन इमारत पाडल्या प्रकरणी बिल्डरसोबत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील(MNS MLA Raju Patil) यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

    बेकायदा बांधकामे एका रात्रीत उभी राहतात का ? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर बांधकाम सुरू असून कारवाई दाखवण्यासाठी एखादी इमारत पाडली जाते इतकेच नाही तर अधिकृत बांधकामाचेही फूटामागे ७५ रुपये घेतले जातात अशी चर्चा असल्याचा गंभीर आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मात्र चौकशी करणारेही याच्यात बुडाले असणार तर काय निष्पन्न होणार असा सवाल ही पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांवर टीका केली आहे.