महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. दुर्गसंवर्धन खाते निर्माण करून त्यात भरीव निधीची तरतूद करून केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करावा. प्रत्येक किल्ल्यावर त्याचा इतिहास, माहिती मिळण्याची व्यवस्था करावी. काही ठिकाणी दृकश्राव्य माध्यमातून ही व्यवस्था होऊ शकते. शिवाजी महाराजांनी देशावर दुर्गांची मालिका निर्माण करून देश जसा शाश्वत करून घेतला. तसेच आरमार सज्ज करून समुद्रावरही राज्य केलं. जलदुर्गांची शृंखला निर्माण केली.

कल्याण : कल्याणचा दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) हा राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या असंरक्षित स्मारकांच्या यादीत असल्याने त्या ठिकाणी राज्य व केंद्रीय पातळीवर निधी उपलब्ध न होऊन संवर्धन होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने हा दुर्गाडी किल्ला संरक्षित करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माची खालचा डोंगर खचला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हे सह्याद्री प्रतिष्ठाणने घेतले आहे. हे काम लोकवर्गणी मधून सुरू झाले असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या कामाला पाच लाख रुपयांची मदत करत आपले कर्तव्य पार पाडले. त्यानंतर आता मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत पत्र लिहत काही मागण्या केल्या आहेत.

महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. दुर्गसंवर्धन खाते निर्माण करून त्यात भरीव निधीची तरतूद करून केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करावा. प्रत्येक किल्ल्यावर त्याचा इतिहास, माहिती मिळण्याची व्यवस्था करावी. काही ठिकाणी दृकश्राव्य माध्यमातून ही व्यवस्था होऊ शकते. शिवाजी महाराजांनी देशावर दुर्गांची मालिका निर्माण करून देश जसा शाश्वत करून घेतला. तसेच आरमार सज्ज करून समुद्रावरही राज्य केलं. जलदुर्गांची शृंखला निर्माण केली.

जलदुर्गातील महत्वपूर्ण किल्ला जो स्वतः शिवाजी महाराजांनी निर्माण केला तो सिंधुदुर्ग शिवकाळातील सिंधुदुर्ग हा एकमेव असा किल्ला आहे जिथे शिवाजी महाराजांचे हाताचे व पायाचे ठसे आहेत. यासाठी म्हणून शिवरायांचं स्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर असावे. कल्याणचा दुर्गाडी किल्ला हा राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या असंरक्षित स्मारकांच्या यादीत असल्याने त्या ठिकाणी राज्य व केंद्रीय पातळीवर निधी उपलब्ध न होऊन संवर्धन होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने हा दुर्गाडी किल्ला संरक्षित करावा आदी मागण्या आमदार राजू पाटील यांनी केल्या आहेत.