मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफची सोय

कल्याण : जगात आलेल्या कोरोना संकटाशी सर्व सामना करत आहोत. अनेक विद्यार्थी घरी बसून अभ्यासापासून अडले आहेत. अशा या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याणतर्फे ई-

 कल्याण : जगात आलेल्या कोरोना संकटाशी सर्व सामना करत आहोत.  अनेक विद्यार्थी घरी बसून अभ्यासापासून अडले आहेत. अशा या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याणतर्फे ई- पुस्तके घरबसल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने घरीच बसावे लागत आहे. शाळा कधी सुरु होतील याबाबत अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घेण्यासाठी कल्या मधील मनविसे पुढे आली असून मनविसेचे शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र बोर्डाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी पीडीएफ स्वरूपात ई- पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

मराठी माध्यमासाठी mnvskalyan.marathi@gmail.com तर  इंग्लिश माध्यमासाठी mnvskalyan.english@gmail.com वर संपर्क करण्याचे अथवा  व्हॉट्स अॅपद्वारे पुस्तके पाहिजे असल्यास दिलेल्या व्हाट्सएप नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन मनविसेचे शहर अध्यक्ष विनोद केणे यांनी केले आहे. विनोद केणे यांना ९८२०२४७९१६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.