कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ताधाऱ्यांनी २५ वर्षांमध्ये केले काय ? – ढासळलेली आरोग्य व्यवस्था पाहून मनसेच्या उपशहर अध्यक्षांचा सवाल

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ढासळलेली आरोग्य व्यवस्था पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करत २५

 कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ढासळलेली आरोग्य व्यवस्था पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करत २५ वर्षाच्या सत्तेत केलं काय असा सवाल विचारला आहे.

सापर्डे गावातील किनारपट्टी लगतच्या २२५ एकर जागेवर मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आयटी पार्क,  नर्सिंग कॉलेज व के.ई.एम च्या धर्तीवर हॉस्पिटल उभे करण्यासाठी आरक्षणाच्या ठरावाला मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्याकडून मंजुरी आणली होती.  त्यावेळेच्या महापौर वैजयंती घोलप व आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी महासभेत हा ठराव घेतला होता. ह्या ठरावाला सत्ताधारी सर्व नगरसेवकांनी विरोध केला. तेव्हा जर मंजुरी दिली असती तर ही वास्तू  कल्याणकरांसाठी मोठी उपयोगाची ठरली असती.  नागरिकांना आज ह्या कोरोना सारख्या महामारीच्या परिस्थितीला आपल्याला तोंड देण्यासाठी मोठी मदत झाली असती. त्यावेळचे महासभेचे मिनिट तपासून पाहिल्यास  खरे सत्य बाहेर येईल असे योगेश गव्हाणे यांनी सांगितले आहे.
 
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर शिवसेना भाजपाची सत्ता गेल्या २५ वर्षापासून असून या २५ वर्षात सत्ताधारी शिवसेनेला कल्याण डोंबिवलीत एकही अद्यावत असे रुग्णालय उभारता आले नसून जे रुग्णालय आहेत त्यांची अवस्था देखील व्हेंटीलेटरवर असल्यासारखी आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी २५ वर्षात केले काय असा सवाल मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी केला आहे.