मोहने गावठाण प्रभागात सापडलेल्या एकमेव रुग्णाला डिस्चार्ज, कोरोनामुक्त झालेल्या नर्सचे नागरिकांनी केले स्वागत

कल्याण : मोहने गावठाण परिसरातील महात्मा फुले नगरमधील एकमेव कोरोनाबधित रुग्ण कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरी झाली असून शुक्रवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला. घरी परतलेल्या या रुग्णाचे

 कल्याण :  मोहने गावठाण परिसरातील महात्मा फुले नगरमधील एकमेव कोरोनाबधित रुग्ण कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरी झाली असून शुक्रवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला. घरी परतलेल्या या रुग्णाचे परिसरातील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवत, फटाके फोडुन स्वागत केले. या परिसरातील हा एकमेव रुग्ण पूर्ण बरा झाल्याने मोहने गावठाण हा प्रभाग कोरोनामुक्त झाल्याची माहिती स्थानिक शिवसेना नगरसेवक दया शेट्टी यांनी दिली. 

शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेली २२ वर्षीय महिला योग्य त्या उपचारानंतर शुक्रवारी पूर्णपणे बरी होऊन रात्री घरी आल्यानंतर घरच्या परिसरात प्रवेश करताच त्या महिलेला सुखद धक्काच बसला. परिसरातील बरेच जण बाहेर उभे होते आणि तिचे टाळ्या वाजवून, फुलांचा वर्षाव, करीत टाळ्या वाजवीत फटाके फोडून स्वागत करीत होते. तिन देखील हे स्वागत हात जोडून स्वीकारले. स्वागत करताना सोशल डिस्टन्सही पाळला गेला. महात्मा फुले नगर परिसरात राहत असलेली ही महिला मुंबईच्या शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी कार्यरत असताना यावेळी ही महिला स्वतः बाधित झाली. ११ एप्रिलला ती राहत असलेला परिसर प्रशासनाने सील करून २० ते २५ जणांना क्वारंटाईन केले व नर्सला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हील रूग्णालयात हालविण्यात आले. दरम्यान तिच्या निकटवर्तीयांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून नर्सने कोरोनावर मात केल्याने शुक्रवारी तिला घरी सोडण्यात आले. योग्य ती काळजी घेतल्यास शासनाच्या आदेशाचे पालन केल्यास आपण या आजाराशी सहजरित्या दोन हात करू शकतो असे या कोरोनावर मात केलेल्या नर्सने सांगितले. तर समाजाची सेवा करता करता मृत्युच्या दाढेतून बाहेर आला आहात. त्यामुळे आम्हाला नर्स ची नक्कीच कदर आहे.” असे सागंत अ प्रभाग सभापती नगरसेवक दया शेट्टी यांनी  आतापर्यंत  बहु संख्येने स्लम् परिसरातील या प्रभागात १७ हजार माक्स, १७०० जीवानाआवश्यक वाटप करत, संपूर्ण परिसरात धुर फावरणी, जंतुनाशक फवारणी केली तसेच सेन्ट्रल किचनच्या माध्यमातून शनिवार पासून गरजवंताला खिचडी वाटप सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.