मोखाडा भागात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान- आमदार सुनील भुसारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

वाडा: पालघर जिल्ह्यातील मोखाडा भागात अवकाळी वादळी पावसाच्या वाऱ्याने कौलारू घरांचे, अन्नधान्याचे नुकसान केले आहे. या नुकसानाची पाहणीविक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी केली.

वाडा: पालघर जिल्ह्यातील मोखाडा भागात अवकाळी वादळी पावसाच्या वाऱ्याने कौलारू घरांचे, अन्नधान्याचे नुकसान केले आहे. या नुकसानाची पाहणी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, सभापती, जिल्हापरिषद सदस्य उपस्थित होते. या पाहणीवेळी अचानकपणे वादळी पावसाने मोखड्यातील कुर्लड सूर्यमाळ भागात काळ सायंकाळी सुमारास घरांचे नुकसान केले. पावसाने अन्नधान्यही भिजविले आहे.याची पाहणी करण्यासाठी त्यांनी या भागाचा दौरा करून  नुकसानग्रस्तांना शासकीय स्तरावर मदत देऊ करण्याचे आश्वासन दिले. यावेळी या भागात येताना कोसळलेली झाडे व विजेचे खांब ही अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली.पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा हा डोंगर दऱ्यांमध्ये वसला आहे. मोखाडा तालुक्यातील कुर्लोद गोमघर, दुधगावमध्ये कालपासून या भागात ढगांच्या कडकडाट जोरदार वादळी वारे वाहत असून हलक्या सरी कोसळत आहेत. भुसारा यांनी मोटारसायकल स्वारी केली. बाईकवर त्या गावात पोहचत त्यांनी तेथील आपत्तीग्रस्तांना दिलासा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, कुसुम झोले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रजीत नायर, तहसीलदार विजय शेट्ट्ये उपस्थित होते.