कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ५ हजारांचा टप्पा

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज एकाच दिवशी तब्बल ४३६ रुग्ण आणि ५ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आजच्या या ४३६

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज एकाच दिवशी तब्बल ४३६ रुग्ण आणि ५ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आजच्या या ४३६ रुग्णांमुळे कोरोना रुग्णांची संख्या  ५३०९ झाली आहे. या ५३०९ रुग्णांमध्ये ३०७९  रूग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून एकूण २१२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १०१ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.