Corona-Virus

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना मृतांच्या(corona death) संख्येने ९०० चा आकडा पार केला असून आज नव्या ३११ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३११ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,१८७ झाली आहे. यामध्ये ३४५१ रुग्ण उपचार घेत असून ४१,८३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३११ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६५, कल्याण प – ९१, डोंबिवली पूर्व ८२, डोंबिवली प- ५१, मांडा टिटवाळा – १४, मोहना – ७, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०१ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १० रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ६ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.