RAJAN VICHARE

ठाणे : ठाणे पालिकेच्या हद्दीचा असत आणि मीरा-भायंदर पालिकेच्या हद्दीची सुरुवात होते. त्या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी शिवसेनेचे खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare)  यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकारी यांच्या समवेत पाहणी दौरा केला. या दौऱ्यात गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतच्या नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पहाणीही करण्यात आली. खा. राजन विचारे यांनी ४ किमीच्या लांबीच्या उन्नत मार्गाचा प्रस्ताव (Gaimukh Ghat to Fountain Hotel elevated road) बनविला. त्यासाठी २४ नोव्हेंबर, २०१७ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६६७ कोटीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आल्याने नजीकच्या काळात गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतच्या नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.

घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टिकुजीनी वाडी ते बोरीवली या भुयारी मार्गाबाबत गती देण्यासाठी दिनांक १० ऑगस्ट २०१६ रोजी संसदेत खासदार राजन विचारे यांनी शून्य प्रहर मार्फत मुद्दा उपस्थित केला होता, या कामाला वन खात्याची परवानगी न मिळाल्याने विलंब लागत होता. या प्रकल्पाच्या तसेच घोडबंदर रोडच्या वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे. असा हि सवाल त्यावेळी केला होता. तसेच या प्रकल्पासाठी लागणारी वन खात्याची जागा मिळवून देण्यासाठी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. सुनील लिमये यांनी सदर जागा महिन्याभरात मिळवून देऊ तसेच नवीन वर्षात या कामाची सुरुवात करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिल्याची माहिती खा. विचारे यांनी दिली.

या पाहणी दौऱ्यात आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, नगरसेवक राजू भोईर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल सावंत, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, पप्पू भिसे, जयराम मेसे, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक नरेश मनेरा, सिद्धार्थ ओवळेकर व इतर शिवसैनिक, पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एम एस आर डी सी चे मुख्य अभियंता श्री सोनटक्के, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुंबई पश्चिम प्रदेशचे सुनील लिमये, उपमुख्य वन संरक्षक ठाणे गजेंद्र हिरे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन तसेच मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे अमित काळे, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी अग्रवाल व इतर संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश होता.

 RAJAN VICHARE

प्रकल्पाची रूपरेषा कशी असणार

अस्तित्वातील असलेल्या २+२ या रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्यात साडे सहा मीटर उंचीचा पिलेर उभे करून त्यावर नवीन एलिव्हेटेड २+२ मार्ग बनविण्यात येणार आहे. त्यामुळे वर-खाली ४+४ असे एकूण ८ लेनच्या मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत.

टोल नाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३+३ अस्तित्वात असलेल्या मार्गिका ६+६ करण्यात येणार आहे.

संपूर्ण प्रकल्प बीओटी तत्त्वावर असणार आहे. या प्रकल्पाच्या रस्त्याची लांबी ४ कि. मी. असणार आहे

वर्सोवा पुलाच्या कमला मिळाली गती- खा. राजन विचारे

राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वर्सोवा येथील धोकादायक झालेल्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून त्याठिकाणी ९७० मी. लांबीचा ४ लेन असलेल्या नवीन पुलाचे काम संत गतीने सुरु होते. दरम्यान निर्माण झालेल्या अडचणी दूर केल्याने आता या कमला गती मिळणार आहे. ११ जानेवारी २०१८ रोजी भूमिपूजन झाल्यानंतरही कामास सुरुवात झालेली नव्हती. त्याला वनविभागाच्या परवानगीची अडचण होती. त्याबाबत संसदेत पाठपुरावा करून पत्रव्यवहार सुरु होता. २९ एप्रिल २०१९ रोजी वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त केल्याने सदरचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना विलंबामुळे काम आता हे काम २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची शक्यता संबंधित अधिकारी व्यक्त करीत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग-८ वर्सोवा मार्गावरून पॅसेंजर कार युनिट च्या अहवालानुसार या मार्गावरून दररोज सव्वा लाख गाड्या ये-जा करीत आहेत. त्यामुळे या प्रकल्पामधील २ अंडरपास फाउंटन चौकामध्ये असल्याने त्याचे काम सुरु करण्यासाठी वाहतुकीचे नियोजन व परवानगी आवश्यक असल्याने खासदार राजन विचारे यांनी उपस्थित असलेले पोलीस आयुक्त सदानंद दाते व वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमित काळे यांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या तातडीने देण्याची विनंती करण्यात आली. व त्यावर त्यांनी या परवानग्या १५ दिवसात देऊ असे आश्वासन दिल्याचे खा. विचारे यांनी सांगितले.