खारेगाव फाटक येथील रेल्वे ब्रीज आणि पाचवी आणि सहावी मार्गिकाचे काम लवकर पूर्ण खासदार श्रीकांत शिंदे याचे प्रशासनाला आदेश

खारेगाव फाटक येथे बांधण्यात येत असलेला रेल्वे ब्रीज आणि पाचवी आणि सहावी मार्गिका बांधण्याचा प्रकल्प या प्रकल्पांमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांचे भविष्य बदलेल. मात्र हे प्रकल्प कधी पूर्ण होतील याबद्दल अजूनही साशंकता आहे. आज या दोन्ही प्रकल्पांच्या कामाची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.

    ठाणे : रेल्वे ब्रीज मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाचे आणि भविष्य बदलणारे प्रकल्प म्हणजे खारेगाव फाटक येथे बांधण्यात येत असलेला रेल्वे ब्रीज आणि पाचवी आणि सहावी मार्गिका बांधण्याचा प्रकल्प या प्रकल्पांमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांचे भविष्य बदलेल. मात्र हे प्रकल्प कधी पूर्ण होतील याबद्दल अजूनही साशंकता आहे. आज या दोन्ही प्रकल्पांच्या कामाची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.

    दरम्यान यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांकडून आणि ठाणे महापालिकेकडून नवीन डेड लाईन सांगण्यात आली आहे. खारेगाव फाटक ब्रिज हा 2006 साली मंजूर झाला होता, तो यावर्षी नोव्हेंबर मध्ये सुरू होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

    तर 2008 साली मंजूर झालेल्या 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेच्या प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2022 साली पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे. हे दोन्ही प्रकल्प अंदाजे 15 वर्ष तरी रखडले आहेत.