कोविडग्रस्त शिवसैनिकांना धीर देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची निऑन हॉस्पिटलमध्ये भेट

ठाणे शहर (Thane City) आणि जिल्ह्यात (District) उपचार घेत असलेल्या कोविडग्रस्त शिवसैनिकांना धीर देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेनंतर आता कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) देखील कोविड वार्डमध्ये जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

 कल्याण : ठाणे शहर (Thane City) आणि जिल्ह्यात (District) उपचार घेत असलेल्या कोविडग्रस्त शिवसैनिकांना धीर देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेनंतर आता कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) देखील कोविड वार्डमध्ये जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आणि कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यावर निऑन हॉस्पिटलमध्ये (Neon Hospital ) उपचार सुरू आहेत.

कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी देवळेकर यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि धीर दिला. तमाम शिवसैनिकांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपली चौकशी केलीय. बंड्या साळवी देखील आता बरे झालेत. तुम्हीही काही काळजी करू नका. तुम्हीसुद्धा लवकर बरे होणार आहात. माझं डॉक्टरांशी बोलणं सुरू आहे. काहीही अडचण वाटली तर मला कधीही फोन करा असा सल्ला देखील त्यांना दिला. खासदार डॉ शिंदे यांच्या या धीर देणाऱ्या शब्दांनी देवळेकर यांना गहिवरून आले.