तांत्रिक अडचणीमुळे मुंब्रा गर्डर लाँचिंगला झाला उशीर ; सोमवारीही मुंब्रा बायपास होता बंद

ठाणे ते दिवा रेल्वेमार्ग जोडण्याकरीता उन्नत मार्गावरील पुलावर लोखंडी गर्डर बसवण्यात येत आहे.यासाठी ७ मार्च व २१ मार्च रोजी मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात आला होता. मात्र,रविवारी २१ मार्च रोजी तांत्रिक अडचण उद्भवल्याने सोमवारीही हे काम सुरूच राहिले.

    ठाणे : ठाणे ते दिवा या मध्य रेल्वेच्या पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सुरू असुन यासाठी मुंब्रा रेतीबंदर येथे उन्नत मार्गिकेवर रविवारी (दि.२१) लोखंडी गर्डर बसविण्यात आला. या कामासाठी वाहतूक शाखेने मुंब्रा बायपास बंद ठेवुन रविवारी पहाटेपर्यत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे काम रखडल्याने सोमवारीही मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूक बंदच ठेवावी लागली.परिणामी ठाणे शहरात वाहतूक कोंडी झाली.

    ठाणे ते दिवा रेल्वेमार्ग जोडण्याकरीता उन्नत मार्गावरील पुलावर लोखंडी गर्डर बसवण्यात येत आहे.यासाठी ७ मार्च व २१ मार्च रोजी मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात आला होता. मात्र,रविवारी २१ मार्च रोजी तांत्रिक अडचण उद्भवल्याने सोमवारीही हे काम सुरूच राहिले. त्यामुळे, वाहतुक शाखेने सोमवारीही मुंबा बायपास बंद ठेवला. परिणामी,मुंब्रा बायपासमार्गे मुंबई, ठाणे, भिवंडीच्या दिशेने ये-जा करणारी जड अवजड वाहने रखडली. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली.