मुंब्र्यातील २५ तबलिगींना क्वारंटाईन कालावधी संपल्यावर अटक

ठाणे : मुंब्राच्या पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्हे तपासाकरिता गुन्हे शाखेकडे आले होते. त्यामध्ये २५ आरोपी असून त्यात काही तबलिकी जमातीचे आरोपी आहेत. तर काही बांग्लादेशी, मलेशिया व भारतीय आहेत.

 ठाणे : मुंब्राच्या पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्हे तपासाकरिता गुन्हे शाखेकडे आले होते. त्यामध्ये २५ आरोपी असून त्यात काही तबलिकी जमातीचे आरोपी आहेत. तर काही बांग्लादेशी, मलेशिया व भारतीय आहेत. त्यांचा आज १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने त्यांना दोस्तीविहारमधुन ताब्यात घेऊन आरोग्य तपासणी करुन न्यायालयात हजर करण्यात आले.

मुंब्रातील अल नदिउल फला या शाळेच्या चार विश्वस्तांवर ८ परकीय नागरिक व २ भारतीय यांची कोणतीही परवानगी न घेता ठेवल्याचा आरोप आहे. तसेच तन्वीय उल उलूल मदर्सच्या विश्वस्तांवर देखील१३ परकीय नागरिक ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील मुंब्रा भागातील एका मशीदीमधून १४
बांग्लादेशी आणि दोघा आसामी तर दुसऱ्या अन्य एका मशीदीमधून ८ मलेशियन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेवून १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करुण ठेवले होते. त्यातील काही जण १० मार्चला निजामुद्दीन  या ठिकावरून आले होते. तेथील कार्यक्रमाशी या लोकांचा काहीही संबंध आलेला आहे का याचा शोध गुन्हे शाखा घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.