akrosh andolan murbad

मुरबाड : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप करत ठाणे जिल्हा भाजप महिला मोर्चाने सोमवारी मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक दिली.

मुरबाड : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप करत ठाणे जिल्हा भाजप महिला मोर्चाने सोमवारी मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक दिली.(murbad bjp protest for women safety)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून राज्यात दिवसेंदिवस बलात्कार, विनयभंग, हत्याकांडाच्या घटना घडत आहेत. कोरोनासारख्या महामारीतही हॉस्पिटल्स, कोविड सेंटर्समध्ये महिला या अत्याचाराच्या शिकार झाल्या आहेत. असे असतानाही राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत भाजप महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष शितल तोंडलीकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुरबाड तीन हात नाका ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील असल्याचा आरोप तोंडलीकर यांनी केला. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मोर्चाला हजेरी लावली होती. मोर्चात ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा दीपाली अय्यर, नगराध्यक्षा छाया चौधरी यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.