कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून मुरबाड नगरपंचायत प्रतिबंधित क्षेत्र घोषित

मुरबाड: मुरबाड तालुक्यालगतच्या क्षेत्रात कोरोनाने चांगलाच शिरकाव केल्याने दक्षता घेत मुरबाड नगरपंचायतीचे क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले आहे. सध्या मुरबाड तालुका हा

मुरबाड: मुरबाड तालुक्यालगतच्या क्षेत्रात कोरोनाने चांगलाच शिरकाव केल्याने दक्षता घेत मुरबाड नगरपंचायतीचे क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले आहे. सध्या मुरबाड तालुका हा  कोरोनामुक्त आहे. लगतच्या शहापूरमध्ये नव्वदपेक्षा जास्त होम क्वारंटाईन आहेत. कल्याण व बदलापूर परीसरातही रुग्ण आढळत आहेत. तसेच रायगड जिल्ह्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. या चारही भागाच्या सीमा मुरबाडला जोडून असल्याने या ठिकाणांहून व्यक्ती मुरबाड तालुक्यात सहजपणे पोहचून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.त्यामुळे मुरबाड बाहेरून कोणतीही व्यक्ती वास्तव्यास आल्याचे निदर्शनास आल्यास संपूर्ण कुटुंबाला शिक्का मारुन चौदा दिवस होम क्वारंटाईन अथवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. अशी बाहेरून आलेली व्यक्ती आढळल्यास ही माहिती कळविण्याचे आवाहन मुरबाड नगरपंचायतीने केले आहे.