शेतकऱ्याची रस्त्यासाठी अडवणूक- मुरबाड तहसीलदारांचे नऊ महिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष, शेवटी पोलिसांकडे केली तक्रार

मुरबाड :एका शेतकऱ्याची स्वतःच्या शेतीत जाण्यासाठी नऊ महिने अडवणूक सुरू आहे.याबाबत अन्यायग्रस्त शेतकरी मुरबाड तहसीलदारांचे उंबरठे झिजवत आहे, मात्र अद्यापही या शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने या

मुरबाड :एका शेतकऱ्याची स्वतःच्या शेतीत जाण्यासाठी नऊ महिने अडवणूक सुरू आहे.याबाबत अन्यायग्रस्त शेतकरी मुरबाड तहसीलदारांचे उंबरठे झिजवत आहे, मात्र अद्यापही या शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने या शेतकऱ्याची ससेहोलपट सुरू आहे. कल्याण येथील संजय गायकवाड यांनी भाजीपाला आणि बागायतीसाठी मुरबाड तालुक्यात मौजे विढे येथे सर्व्हे क्रमांक १६४ /२ ब  मध्ये ७९-०० गुंठे जमीन मिळकत विकत घेतली आहे. या जमीनीस लागून सर्व्हे क्रमांक १६४/१अ,  ही पोपटलाल केसरमल भंडारी यांची जमीन मिळकत आहे. गायकवाड यांच्या शेतीत जाण्यासाठी भंडारी यांच्या  मालकीतुन रस्ता आहे. मात्र भंडारी यांनी त्यांच्या जमिनीला पक्के बांधकाम कंपाउंड करून हा रस्ता कायमचा बंद करून टाकल्याने आता पावसाळ्यात शेती कशी करावी,  असा प्रश्न गायकवाड यांना पडला आहे. मुरबाड तहसीलदारांना गायकवाड यांनी वेळोवेळी याबाबत तक्रारी अर्ज केले आहेत, मात्र  तहसीलदार अमोल कदम यांचा याकडे कानाडोळा सुरू आहे. त्यामुळे याबाबत गायकवाड यांनी मुरबाड पोलिसांकडे अन्याय होत असल्याबाबत तक्रार नोंदवली आहे.