मुरबाड बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा नगरपंचायतीचा निर्णय

मुरबाड: सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुरबाड बाजारपेठ शनिवारपासून तीन दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय मुरबाड नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. पुढील तीन दिवस फक्त बाजारपेठेतील मेडिकल दुकाने सुरू असतील, असे

मुरबाड: सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुरबाड बाजारपेठ शनिवारपासून तीन दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय मुरबाड नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. पुढील तीन दिवस फक्त बाजारपेठेतील मेडिकल दुकाने सुरू असतील, असे नगरपंचायत प्रशासनाने कळवले आहे.

सध्या मुरबाड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, मात्र लगतच्याच शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले संशयित सापडले होते.शहापूर तालुक्यात दररोज वाढणारी रुग्णांची संख्या पाहता शहापूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्याने शहापूरच्या किन्हवली आणि शेणवे भागातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. उद्यापासून शहापूरच्या बाजारपेठा दहा दिवसांसाठी कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिक मुरबाडकडे बाजारासाठी वळतील, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुरबाड नगरपंचायतीने बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.